STORYMIRROR

Vaishali Ayya

Tragedy

4  

Vaishali Ayya

Tragedy

शेवटचं

शेवटचं

1 min
23.2K

जाता जाता थोडं राहूनच गेलं 

तुझं ते नेहमीचं हसणं 

हसता हसता माझ्या आनंदाचं, कुंकवाचा करंडाच घेऊन गेलास 

अजून बरंच काही खरं तर उरलं होतं 

अजून त्या शालूची घडी पुन्हा मोडायची होती 

अजून त्या कचकणाऱ्या रंगीत बांगड्या घालायच्या होत्या 

जर्जरणाऱ्या आजाराने असं करायला नको होतं 

आत्ताच कुठे बसलेल्या आयुष्याच्या घडीला अनुभवायचं होतं 


तुलाही आधीच कळले होते... आयुष्य तसे मोठे नव्हते 

परंतु तुझी जगण्याची आस मला रंगवून टाकायची 

येणाऱ्या मृत्यूवर मी पांघरून घालायची 


वेदनेतही किती चमकत होता तुझा चेहरा 

तुझेही आणि माझेही प्रयत्न कायम होते 

भरपूर जगायचं... आणि भरपूर करून पुरायचे... 

पुरणाऱ्या त्या आयुष्यातही करायचं होतं बरंच काही 


रात्रीच्या त्या चांदण्याही आज विचारतायत मला 

जाता जाता थोडं राहिलंच होतं तुझं त्यांच्याशी हितगुज करणं 

तोच वाराही खट्याळ खेळून चुकला

गाडीवरच्या माझ्या जोडीदाराला शोधून तो हरला 


यातनांच्या या अंथरुणातून पुन्हा तुझं येणं राहूनच गेलं

शेवटचा मला तुला भरभरून पाहणं राहूनच गेलं... 

तुझ्याशी मारायच्या शेवटच्या गप्पाही राहूनच गेल्या 


पण मला माहिती आहे 

माझ्या मनात तू तसाच आहेस 

तुझा आत्मा हा माझ्यातच आहे 

तुला मी माझ्यात पाहीन 

तुला मी माझ्यातच ठेवेन 

तुला मी माझ्याच कवेत घेईन 

कधी कधी निःशब्द होणारी...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Vaishali Ayya

सागरा...

सागरा...

1 min വായിക്കുക

आठवतयं

आठवतयं

1 min വായിക്കുക

शेवटचं

शेवटचं

1 min വായിക്കുക

(मु)खवटा

(मु)खवटा

1 min വായിക്കുക

भावना

भावना

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Tragedy