STORYMIRROR

सुरेश पवार

Fantasy

3  

सुरेश पवार

Fantasy

सागर लहरी

सागर लहरी

1 min
11.4K

सायंकाळचा फेरफटका

सूर्यही लालेलाल झाला


पडती सूर्यकिरणे सागरात

जशी सोनेरी दुनियेची लाट


उसळून लाटा उंच उंच 

जसे बनावे शिखर 


लहानग्याची चाले घाई 

लहरींमध्ये ओलेचिंब होई


आठवते ते दिवस 

वाळूचे बांधावे ते घर


सागरकिनारी सुरुच्या 

झाडाची गत लई भारी


लाटांमध्ये पुन्हा भिजावे

ओलेचिंब व्हावे ओलेचिंब व्हावे


उसळत्या लाटा जणू 

संगीताच्या लाटा 


अथांग सागर बोले मजसी 

ये मज संग गाऊन घे गाऊन घे


जीवन गाणे गाऊन घे

माझ्या सागरात नाचून घे


जीवन असावे तर सागरासारखे

मन असावे तर सागरासारखे


अशा या सागर लहरी

अशा या सागर लहरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy