STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

कोकणातला पाऊस

कोकणातला पाऊस

1 min
777

सुरू जाहला मिरग, सणांची आरास झाली

कोकणातल्या पाहिल्या पावसाची, स्वप्नांतिक सुरुवात झाली

सरीत पाहिल्या सह्याद्रीची, उंच शिखरे न्हाली

आनंदमयी वर्षा, सणसराईसह आली


न्हाऊन उजळला हिरवळीने, आमचा आंबोली घाट

पानगळीच्या रांगोळीने सजली, एकूणएक वाट

रूळावरती कोकणकन्या सोडी, हवेत काळा धूर

लालपरीतून जाताना येतो, आठवणींना पूर


खुलून आले रंगांनी, हरित कोकणाचे वैभव

वाट काढी चाकरमानी, चाखत मेव्याची चव

सुंदर संपन्न गणेशोत्सव घाली तयाला साद

मनी सदा भरूनी राहे, दशावताराची याद


घर कौलारू कोकणातले, अन त्यावरून ओघळणारे पाणी

चातकासह हूड मंडूकी, आळवे तयाची गाणी

हूळहूळणाऱ्या थंड झर्‍यातून, इथे वाहते प्रीती

वाहत वाहत जणू सांगते, कोकणातल्या रिती


वनवल्ली ही खरी संपदा, कोकण भूगर्भातली

रम्य अजूनी तया बनवण्या, गंगा राजापूरी पातली

मद्याहूनही धुंद करवतो, कोकणात घालवलेला काळ

मरणानंतरही अशक्य तुटणे, कोकणभूमीशी नाळ


Rate this content
Log in