जोकर
जोकर


दुसऱ्याच्या चेहऱ्यावर, हास्याची कळी फुलवण्यासाठी,
स्वतःचे दुःख लपवून, तो विचित्र हासतो सर्वांसाठी ||
जोकर बनून कुणाला, हसवणं कठीण असतं,
हसणाऱ्याकडे हसण्याचे कोणतेही कारण नसतं ||
रंगीबेरंगी कपडे घालून, मेकअप करून जोकर बनतो,
अंतरंगी चित्ताकर्षक करणारा, तो माणूस असतो ||
आपल्या स्वतःच्या चेहऱ्याला, तो विद्रूप करतो,
लोकांसमोर इकडे तिकडे धावतो पडतो ||
नवीन नवीन कला , आपली तो दाखवितो,
पाय डोक्यावर ठेवून, चालत हात मटकावितो ||
थोड्याच वेळात एका, रिंगला तो आग लावतो,
त्या आगीतून उठून स्वतः जळत असतो ||
लोकं हसले की, चेहऱ्यावर तो राग दाखवितो,
हसत हसत लगेच, मग तो फुलून जातो ||
कपडे त्याचे ढिले ढाले पैजामा घालतो
आपली मांडी ठोकत, एखाद्या पैलवानासारखा दिसतो ||
विनोदी चेहरा करून, नेहमी स्वतः हसत राहतो
आपले दुःख लपवून, लोकांना तो हसवत राहतो ||