Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Abasaheb Mhaske

Fantasy


3  

Abasaheb Mhaske

Fantasy


चिऊताई घरटं तुझं सुंदर बाई

चिऊताई घरटं तुझं सुंदर बाई

1 min 14.8K 1 min 14.8K

चिऊताई चिऊताई घरटं तुझं सुंदर बाई 

अंगणी येतेस घाई -घाई उडत भुर्र भुर्र  

अलगद दाणा टिपून क्षणात होतेस फुर्रर्र ... 

इवल्याशा चोचीत पिलासाठीहि घेऊन जाते 

चिऊताई - चिऊताई बघून तुला बाळ माझं हरकत 

अंगणी माझ्या खिदळत , गातेस का ग तू अंगाई ?

इवलासा जीव तुझा तरी चिवचिवाट असतो भारी 

तू येतेस तेव्हा घरंदारं सारं आनंदून जात .

चिऊताई - चिऊताई घरटं तुझं दूर - दूर 

तू अंगणी येतेस ना अंगण माझं फुलून येत 

नको जाऊस ग तू तिकडे तुझं घरटं इथंच बांध 

होईल दोस्ती त्यांची गडे ! माझं बाळ तुझी पिलं 

चिऊताई - चिऊताई आर्जव माझी ऐक ना गडे !

कशाला जातेस आम्हाला सोडून तुझी पिलं इथंच आण 

फार नको ग विचार करू , हे हि घर तुझंच म्हण 

आपुली मैत्री झाली तशी ,खेळेल माझं बाळ ,तुझी पिलं 


Rate this content
Log in

More marathi poem from Abasaheb Mhaske

Similar marathi poem from Fantasy