बिंब प्रतिबिंब
बिंब प्रतिबिंब
एक घर
चार भिंती
एक छत
सजलेलं
सजवलेलं
मोठमोठ्या आरशांनी
रंगीबेरंगी नक्षीदार आरसे
बिंबा प्रतिबिंबांनी सजलेल्या भिंती
नेहमी प्रमाणे ती आली
दरवाजा उघडला
हजारो बिंब डोक्यात शिरले
डोक्यात कोलाहाल सुरू झाला
कुजबूज,किंकाळ्या,रडणे,हसण्याचा आवाजानी डोक्यातला गोंधळ आणखीनच वाढला
ती गोंधळून गेली
कावरी बावरी झाली
इकडेतिकडे चकरा मारू लागली
अचानक हातप्र तिबिंबाला लागला
बिंब तडकलं
काच फडफडली
प्रत्येक तुकड्यात प्रतिबिंब अडकूनच राहिलं
कोलाहल आणखी वाढला
दरवाजा शोधू लागली
तो दरवाजा बोलत नव्हता
पण
भिंती मात्र बोलत होत्या पण
त्या कोलाहालात त्या भिंतीचा
आवाज मात्र कानात शिरत नव्हता
