Vijay Indushokai

Abstract


3  

Vijay Indushokai

Abstract


कोरोना व्हायरसने इन्फेक्ट करुन

कोरोना व्हायरसने इन्फेक्ट करुन

1 min 461 1 min 461

अनासक्तीही आता अनासक्त व्हावी

या आसक्त शांततेत

पोरके व्हावे एकटेपणही

एकांतात एकटं एकटं


मी रांजणात साठवून ठेवलेल्या सगळ्या गांडू आठवणी

मला आठवू नयेत

कावळ्याने त्यात दगड-धोंडे टाकूनही


मी न्यूरॉन्समध्ये कोरुन ठेवलेल्या आठवणी

कोरोना व्हायरसने इन्फेक्ट करुन

वाटल्यास त्या काॅपीही होवू देणार नाही.

पण

शरीर-मेंदू अाणि मन यांनी चालवलेला निचपणा

मला जीवनभाड खाणार्‍यानेही तटस्थ सांगितला

तरी

मी त्याला कन्फ्युशियसवचन म्हणून मान्य करीन.


जीवनाला खरंच जीवन समजत होतो मी


जन्म आणि मृत्यु यांच्यामधला

नियामक भंपक वायफळपणा

वेगवेगळ्यांसाठी वेगवेगळा भ्रामक अर्थपूर्ण अर्थ

अनर्थ टाळण्याचा अर्थासह

ज्याचा अर्थ व्यर्थातही मिळत नाही

निरर्थकपणेही नाही.

मुर्खांनी मुर्खांना मुर्खपणा समजवण्याचं शहाणपण दुसरं कोणतंच नाही शहाण्यांमध्येही...


Rate this content
Log in

More marathi poem from Vijay Indushokai

Similar marathi poem from Abstract