Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Indushokai

Others

2.5  

Vijay Indushokai

Others

बरे तुकोबा

बरे तुकोबा

1 min
468


कापले डोंगर । झाल्या नद्या वांझ

भास्करा न् सांज। आज येथे

तिमिर छाटण्या । राती न् झोपल्या

पणत्या खपल्या । तम तरी

विझलेले मन । नितीही बेभान

अन्यायाचे रान । कोण जाळी?

जाळलेले सत्व । शिथिल अस्तित्व

वायफळ तत्व। अनमोल

झोल आकाशाचा । तोल सागराचा

रोल माणसाचा । तोलहीन

सगळेच झोल । आहे मातीमोल

अदम्यच फोल । संस्कृतीही

लांडगे लिहीती। येथे शैार्यगाथा

हरिणाची व्यथा । मुक मुक

श्वासाचा वास । जिण्याचा त्रास

मातीचाही वास । खास नाही

भ्रामकच सारं । भ्रमिती भासही

भ्रष्ट सत्यासही । भास नाही

इमाना कै लाज । लुच्चांचा आदर्श

खर्‍याचाही स्पर्श । होवू नये

स्विकारले नाही । जीवन इथले

आज जे जगले । जिणं नाही

जीवांच्याही जाती । माणसांची नाती

कोणाच्या हाती । कोण आहे

माणुसकी सोंग । बोभाटा मान

खोट्यांची खाण । खानदानी

बरे तुकोबा तु । मेलास रे आधी

माणसे न् साधी । तुजसम

विजा म्हणे तुला। आठवत नाही

विसरलो नाही । आठवण्या


Rate this content
Log in