STORYMIRROR

Vijay Indushokai

Tragedy

1  

Vijay Indushokai

Tragedy

आकाश

आकाश

1 min
400

वेळोवेळी निसर्गही सिध्द करत राहतो कि सगळे आपापल्या निर्मित सत्यात रममान आहेत____


मी त्यांना सांगितलं त्यांचं आकाशही खरं नाही.

त्यांनी सभ्य शिव्या दिल्या___

मी त्यांचं आकाश कसं मुर्दारहे, कागदागत फाटून जातं,

मी फाडूनही दाखवलं.

त्यांनी मला वेड्यांच्या गंतीत काढलं, 

मला फालतु पेक्षाही हीन हिनवलं. 


मी काहीच बोललो नाही.


ते म्हटले,

     " आम्ही सभ्य लोक, आमची संस्कृती आहे, परंपरा आहेत. आम्ही त्या जिवापाड जपतो. परंपरा जपणं सभ्यतेचं लक्षण आहे.

     आम्ही आकाशाला बाप मानतो, सर्वस्व मानतो. आकाशातल्या देवांना मानतो. त्यांच्या प्रमाणे चालतो, वागतो आणि जीवन जगतो. आम्ही समृध्द आहोत, आनंदी आहोत.

आता आम्हाला कशाशीही काही देणं-घेणं नाही."

    मी म्हटलो मग त्या खर्‍या आकाशाचं काय? तर ते म्हणे आम्ही सांगू ते खरे, ते सत्य. आमची मानसिकता, आम्ही पसरवलेली मानसिकता मेजॉरीटीमध्ये आहे. 

नसेल तर आम्हाला तसं करायला काही वेळ लागत नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा मला वाळीत टाकलं.

    

    त्यांच्या आकाशाने माझं छत्र हिरवून घेतलं.

    ते माझ्या घरी पाऊसही पडू देत नाही.

    आकाश भेदभाव करतं.

    त्यांच्या खर्‍यामध्ये खरंच खरं खराबहे____

    मी पाणी-पाणी करत आकाशाकडे बघून मरतो

    ते दररोज माझे एक -एक करुन कपडे फाडतात  

    आणि अंगा-तोंडावर मुतून निघून जातात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy