STORYMIRROR

Vijay Indushokai

Others

4  

Vijay Indushokai

Others

खुपदा

खुपदा

1 min
316

कुणालाच कुणाची गरजेशिवाय गरज नसते

तरीही नाती समृध्दपणे टिकलेली आहेत ती भासात असोत की श्वासात.


नात्यातली गहणता समजणं नि नाती गहणतेने समजणं

आज समजण्यापल्याड वाटत असलं तरी

विश्वासघात होईपर्यंत विश्वास टिकवण्याची ताकद

त्या नात्यात नक्कीच असते... फक्त ते नातं असायला हवं.


तसं खुपदा विश्वासघात सहन करुनही पुन्हा

तशाच विश्वातघाताची वाट पाहत जगत राहण्यातही

खुप जणांना धन्यता वाटते.

लोकं त्यांना मुर्ख समजतात नि ते लोकांना मुर्ख नि

हा असा सभ्य मुर्खपणा पार पिढ्यांपिढ्या चालत राहतो.


लोकांना परंपरा नि संस्कृती खुप आवडतात त्या अमानुश असल्यातरी फक्त पध्दतशीरपणे मुर्ख बनवणार्‍या हव्यात.


Rate this content
Log in