Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract

3  

Neha Ranalkar

Abstract

अगतिकता

अगतिकता

1 min
452

अशाश्व़ताचे मज दर्शन नित्य घडावे |

शाश्व़तासाठी तरी मी नित्य का झुरावे | |१| |

कधी कधी वाटतं खूप खूप रडून घ्यावं | 

आभाळा सारखं निरभ्र मोकळं होऊन जावं | |२| |

अनंत काळाच्या पोकळीत शिरून

आपलं आपणच एकदाचं मरून जावं |

या लक्तर देहाचे कलेवर होऊन

दूर वेशीवर खुशाल उधळून द्यावं | |३| |

परम पित्याच्या कुशीत शिरून 

स्वतःलाच पूर्ण विसरुन जावं |

त्याच्या अनंत पोकळीत श्र्वास

सोडत कायमचं विरुन जावं | |४| |

अफाट विश्वाच्या या पसा-यात मी कोण

कशासाठी येथे आलो हेच कळत नाही |

सर्व प्रश्नांचे उत्तर मिळे पर्यंत मी चा शोध  

काही केल्या थांबणार नाही | |५| |

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract