SK JI

Abstract Others


3  

SK JI

Abstract Others


मी,फिरतो.

मी,फिरतो.

1 min 283 1 min 283

मी फिरतो नाना प्रकारची लेबल लावून.

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी घडवणार इतिहास फक्त माना मध्येच. 

प्रगतीची, क्रांतीची हुंदकी उठते कधी आधी मध्येच. 

खंत फक्त मांडायाची लागली सवय राहुन राहुन. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी हा,मी तो,मी कोण हे मलाच माहितच नाही. 

दुस-यांवर बोटं ठेवण्याच्या गडबडीत, माझा मी राहातच नाही. 

मी जळतो, स्वतःदुस-यांवर 

जळुन जळुन. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी लडतो, का,लढा देतो माझ्याच माणसांशी.

मी घेतले सोंग झोपेचे, डोक्याखाली घेऊन स्वार्थाची उशी. 

मीच करतो सर्व सहन येऊन जाऊन. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी करणार दंगे, जाळणारा घरे,काही कारण नसताना. 

मीच देतो साथ हिंसेचा, मार्ग शांततेचा असतांना. 

ज्यांच्यावर केला विश्वास आम्ही,ते बसलेत खाऊन पिऊन. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी पुढारी व्हायच, का समाजसुधारक,हेच कळत नाही. 

ज्यांनी दाखवला जो प्रगतीचा मार्ग, तो कळतोय पण वळत नाही. 

काय करावे,कसे करावे, हाच प्रश्न पडतो राहुन राहुन. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.


मी फिरतो नाना प्रकारची लेबल लावून. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून. 

मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून. 


Rate this content
Log in

More marathi poem from SK JI

Similar marathi poem from Abstract