Vaishali Belsare

Abstract Others


3  

Vaishali Belsare

Abstract Others


-आतले झरे-

-आतले झरे-

1 min 759 1 min 759

मी माणसांच्या वस्तीत.....

माणसांना भेटते...नाही भेटत

चेहरे.....आतून पोखरलेले.....

अहंकाराने उन्मत्त झालेले..... विकृत !

असंख्य रणशंख वाजतात

सैरभैर भावना होतात

किळस वाटू लागते स्वतःचीच !

कारण वरवर का होईना ते दिसतात माझ्यासारखेच !

कवच कुंडल काढून घेतलेल्या

कर्णासारखी मीही एकाकी......

पण तेवढ्याच सामर्थ्याने लढते

त्यांच्या दुष्ट मेंदूतून बाहेर पडणाऱ्या

विचारांसोबत !

हे करतांना...........

कित्येकदा व्यापुन टाकते आतली ओल

मनाला आणि देहालाही.......!

पण घट्ट बसवलाय त्यावर दगड

एखाद्या निर्जन बेटाप्रमाणे.....

आतल्या ओलाव्याचे दगड बनू नयेत म्हणून....!

आणि हरलेल्या राजाप्रमाणे मांडलिकत्व

मान्यही नाही

जिथे मी झुकले तिथे मी संपले

हे माहित आहे........

आतल्या झऱ्यांनाही!


Rate this content
Log in

More marathi poem from Vaishali Belsare

Similar marathi poem from Abstract