STORYMIRROR

Vaishali Belsare

Others

4  

Vaishali Belsare

Others

कितीदा

कितीदा

1 min
452

कितीदा गीत प्रेमाने तुझे ओठात यावे

कधी माझे तराणेही तुझ्या हृदयात यावे


सदा मी भासते तुजला सुखाने गोंदलेली

तळाशी दु:ख दडलेले तुझ्या ध्यानात यावे


मनी मी बांधले कंकण प्रितीने सांधलेले

मनाला वाटते आता तुझ्या विश्वात यावे


अपेक्षा फार माझ्या तरी आहेत कोठे

म्हणाले हेच की मी तुझ्या नावात यावे


जरा दोऱ्यास दु:खाच्या करावे सैल देवा

मनाच्या या पतंगाने नव्या मेघात यावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन