Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaishali Belsare

Others

3  

Vaishali Belsare

Others

कोटी कोटी नमन

कोटी कोटी नमन

1 min
189


पावन झाली भारत भूमी,

जिथे तुझा जन्म झाला कोटी कोटी नमन माझे,

माझ्या सावित्री आईला |धृ 


त्रास दिला हो लोकांनी, पण मानली ना हार 

केला प्रत्येक रुढींवर, दोघे मिळूनी प्रहार 

दिला शिक्षणा सोबत, मान प्रत्येक बाईला || १ ||

कोटी कोटी........


विधवामाता, सतीप्रथा, बालविवाह केशवपन

रुढी आहेत जाचक, दिले सर्वास पटवून 

सहन केलेल्या वेदनांना, न्याय शेवटी मिळाला ||२||

कोटी कोटी .....


बंधनांना झुगारूनी, पाश चौकटीचे तोडी

स्त्रीमुक्तीच्या लढ्यात, सुख, संसारास खोडी

दु:ख जाणिले इतरांचे, कधी पाहे ना स्वतःला ||३||

कोटी कोटी .....


किती वर्णावी थोरवी, शब्द शब्द थिटा झाला 

आज लेकीत तुझ्या गं, तुझा विचार तोच भिनला 

त्या काळातही आई, विचार आजचा मांडला ||४||

कोटी कोटी ......


Rate this content
Log in