STORYMIRROR

Vaishali Belsare

Romance

3  

Vaishali Belsare

Romance

धुंद काजळी

धुंद काजळी

1 min
351

धुंद काजळी रात्र वेडी 

अन् भेट थेट आपुली 

दोन मने आतुर आज 

प्रीत अंतरी गंधाळली .....


तव लोचनात पाहता 

हरवले मी भान सारे 

स्तब्ध झाले जग थांबले 

लोपले हे नभीचे तारे ......


हातात हात घेतांना हा

भाव अलवार जागले

प्रीतवेड्या गुंजनातून

देहात शहारे स्पंदले......


तरू आणि चंद्र सोबती

लाजणाऱ्या ह्या पापण्यांना

एकांत समयी चढले

कैफ निलाजऱ्या क्षणांना.......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance