Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vaishali Belsare

Others

3  

Vaishali Belsare

Others

अलौकिक संत

अलौकिक संत

1 min
285


भक्तीचा पळस । धर्माचा कळस

वाचार्थ तेजस । तुका आहे ।। १ ।।

तुझिया गाथेत । प्रपंचाचे सार

आध्यात्म भांडार । अलौकिक ।। २ ।।

आली नाही तुझ्या । जगण्यात कधी

मी पणाची व्याधी । अहंताही ।। ३ ।।

अनिष्ट प्रथांची । तोडली बंधने

संता तू कर्माने । सुधारक ।। ४ ।।

निस्वार्थी स्वभाव । माणसात देव

असा तुझा भाव । वंदनीय ।। ५ ।।

खरा तुच संत । प्रपंची वैराग्य

लाभले सौभाग्य । विठू नामे ।। ६ ।।


Rate this content
Log in