STORYMIRROR

Vaishali Belsare

Others

4  

Vaishali Belsare

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
478

माझ्या मराठीची शान

आहे आगळी वेगळी

मायबोली या विविध

किती जपल्या जवळी...


मनोमनी तुझा ठाव

रेखे मनातील भाव

सुख-दु:खाच्या काळात

एक आपलेसे गाव...


तुझी थोरवी महती

साधु-संत सारे गाती

दाही दिशेने घुमते

माय मराठीची ख्याती...


तुझ्या उदरी जन्मले

शुरवीर व विद्वान

शब्दा शब्दात उमटे

थोर साहित्याची खाण...


गर्जे जयजयकार

तुझा डफ मृदुंगात

माझी मराठी दिसते

नऊ रस शृंगारात...


माझे तुझ्याच सेवेत

आहे कृतार्थ जगणे

माझी मराठीच बोली

आहे सांगते गर्वाने...


Rate this content
Log in