STORYMIRROR

Vaishali Belsare

Others

4  

Vaishali Belsare

Others

अट्टाहास

अट्टाहास

1 min
435

हरेक क्षण जिंदगीचा खास आहे

जरी दु:खा तुझा सहवास आहे........१


काळजाच्या कपारीतील हुंदक्यांनो

तुम्हासह माझा निरंतर प्रवास आहे......२


दाटतो अंधार जीवनी चौफेर जेव्हा

उरात धगधगणारा तेव्हा श्वास आहे......३


झुकत नाही मी कधीही त्यांच्यापुढे

 त्यांच्या मी पणाची वाढती रास आहे......४


आयुष्यातील लढाई जिंकणारच आहे

ना माझा खुलासा हा अट्टाहास आहे..........५


Rate this content
Log in