STORYMIRROR

Vaishali Belsare

Abstract

3  

Vaishali Belsare

Abstract

मन

मन

1 min
310

मन हाये अवसान

मन आसवाची देन

मन फाटक अभाय

मन अत्तराचं लेन


कदी आपलसं वाटे

कदी दुरदुर भेटे

किती आवरा तरीबी

मन तडकले ओटे


कचकोड बिल्लोराचे

आंजोईत रे तुकळे

मन तळफळ एक

घाली देवाले साकळे


तिरकट तिटकारा

लपे तमाम मनात

काई समजेना याचे

किती घालते अकात।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract