गुरुजी
गुरुजी
गुरुजी, तुमच्यामुळे घडलीत अनेक भविष्य
आणि प्रकाशीत आयुष्य...........
गुरुजी, तुम्हीच शिकवलेत......
न्यूटन, होमी भाभा, आणि अब्दुल कलाम.....!
अन् दिलेत चिकित्सेला, जिज्ञासेला...
नवीन पंख..... आकाश पार करणारे...!
इतिहासही शिकवलात तेवढ्याच...तन्मयते...!!
इतिहिसातून भविष्य गाठायला......
प्रेरणा, अनुभवातून जगण्याची.....
लढण्याची जिद्द, सत्याची कास...!
तुम्हीच दिलीत गुरुजी !
त्रिकोण, काटकोन, पायथागोरस
अन् शिकवलेत....am, is, are
व्यावहारिक जगाकरीता....तठस्थतेने उभे राहायला!
पाठाचे, काव्याचे..स्पष्टिकरण संदर्भ, अर्थ....
सांगितलेत तसा जीवनाचा अर्थ कळायला लागला !
गुरुजी तुमच्या छडीत, रागात....
काळजी, माया भरभरून होती.. उज्वल भविष्यासाठी
गुरुजी प्रणाम तुमच्या कार्याला व
कर्तृत्वाला..!
