!....आता?
!....आता?




अज्ञानाच्या अंधकारातून
येऊन पडला प्रकाश आता,
उरात आता धडकी भरून
धावू लागला जोरात आता...
मनात माझ्या स्वप्न पुसपुटले
रणांगणात जाऊन मारलो आता...
होते नव्हते तेही विरले
खेळगड्या स्वप्नांच्या दुनियेत आता...
ऋतु येतात पालवी फुटते
फुले मोठया रंगात आता...
दगडांनाही पाझर फुटतो
घामसाळलेल्या अंगात आता....
हसतांनाही तोल सुटतो
बोलण्याच्या डोहात आता...
चादरीत रडतांनाही ओल सुटतो
मोहाच्याया मनात आता...
नकोनको ते बोलणे होते
आळा नसतो शब्दांनाही आता....
ह्रदयात मात्र भीत होते
नसण्याच्या या जगण्यात आता....