दुय्यम
दुय्यम
आसं वाटतं आज खुप धावलो, धाऊन धाऊन रात्रीच्या अंधारी थांबलो.
थोडासा आराम मिळाला, त्यातच आता धन्य पावलो.
दिवसभरात कित्येकदा, आपल्यानवरच कावलो.
रागारागात जरी अंगावर, असेल मी धावलो.
शांत झालो की वाटतं, वागलो किती चूक.
जानतेपणी बोलताना, रागाला नसावी शब्दांची भूक.
असो झाल गेल सगळं, आता सगळं ठीक आहे.
थोडय़ा मोकळ्या वेळेनंतर, पुन्हा धावण्याची ओढ आहे.
पण या वेळी मात्र, सोबत आहे सय्यम.
कितीही पेटले मन, तरी दर्जा देणार नाही दुय्यम.
