घडवायचे परिवर्तन
घडवायचे परिवर्तन
अब्रुची लक्तरे तोडित जाती
नराधम ते या जगती
निर्लज्ज होऊनी येथे हिंडती
काय म्हणावी ही विकृती ?
स्त्रीवरती पोवाडे ते रचति
वर्णिती थोर तिची महती
परि आज तिज वाटे भीती
हिंडण्यासही अवतीभवती.
कसे विचार हे कोठे नेती
हाय, कशी संस्कारांची क्षति!
उध्वस्त घरांची नसे गणती
कितिक मने ती आक्रंदति.
सांगा कोण हो विडा उचलती?
परिवर्तन ते करण्यासाठी
बंधुत्वाच्या उजळूनिया वाती
सुरक्षित तिजला हो करिती.
विचारमंथनातुनि निपजति
समानतेची तेजस्वी महति
भावबंध मग येथे सजती
आनंदी फुलपाखरे भिरभिरति.
