STORYMIRROR

Neha Talathi

Inspirational Others

3  

Neha Talathi

Inspirational Others

माझी मराठी माऊली

माझी मराठी माऊली

1 min
188

माझी मायबोली आहे

गच्च अमृताचा घनू

उच्चारता शब्द शब्द

वर्षे हर्षानंद जणू


माय मराठीची ख्याती

साता समिंदरा पार

गोडी मधुर अवीट

नाही त्याला पारावार


माय मराठीची वाणी

अमृताते पैजा जिंकी

नाही फक्त राजभाषा

जनसामान्यांची सखी


तिचा मान राखावया

राजा शिवाजी उदेला

संगे मावळ्यांच्या त्याने

दृढ संकल्पच केला


गुणगान तिचे करी

ज्ञाना, तुकोबा माऊली

शांताबाई, पु.ल, व. पु

ढेर सारी नामावली


तिची शैलीच अमोघ

हरवून जाई मन

जपायला तिचा बाणा

राबू सारे रातदिन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational