सहवास
सहवास
स्वप्नात तुझ्या माझे वास्तव्य असावे
वास्तव्यात जगतान माझे स्वप्न तुला दिसावे
तुझी सकाळ माझा चेहरा बघून
रात्र मला मिठीत घेऊन
हृदयात तुझ्या माझ्या आठवणी
डोळ्यात तुझ्या माझ्या काळजीच्या साठवणी
प्रत्येक विचारात तुझ्या माझे प्रतिबिंब दिसावे
शब्दांशब्दात तुझ्या माझेच अस्तिव असावे
तुझ्या हसऱ्या मुखावर माझे भाव उमटावे
दुःखाचे अश्रुही माझ्या ओंजळीत आटावे
वाटावी तुजला नेहमी माझी साथ हवीहवीशी
संपावे शब्द पण भावना जपणारी आपुलकी अशी
असावे रिते एकमेकांशिवाय हे आपुले जीवन
सहवास असावा असा फुलेलं नंदनवन
