कविता
कविता
मन अस्वस्थ होते
व्यक्त व्हावं वाटतं
कसे नि कुठे ?
कळत नाही नेमकं..
ऊन-सावलीचे जीवन
विरह, दुरावा, अबोले
समज-गैरसमज सारे
न सुटणारे आजीवन
घुसमट होते खूप
कोंडमारा होतो आत
न बोलता सहन करून
झीज होते झपाट्याने
सहन करीत जगायचे
सगळ्यात तरी एकट्याने
गर्तेत सापडते नैराश्याच्या
मग एकाकी हे मन
अचानक आतून काही
जाणवायला लागतं
उसळी मारून मनाच्या
बाहेर हे काही येणं
एक नवीन अनुभवणं..
अंधाऱ्या काळ कोठडीत
लख्खन चमकते एक वीज
उजळून निघते त्यात मन
शांत होऊ लागतंय मन
कळलंय त्याला आता
सोबत करण्या आली आता
त्याची स्वतःची कविता...