STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Action

2  

Mita Nanwatkar

Abstract Action

मोत्याचं दान

मोत्याचं दान

1 min
11

साद मनास घालते

आठवण पावसाची

कशी सांगावी महती

अनमोल दिवसाची

भर उन्हात एकदा

मेघ दाटून रे आले

गारव्यात सुखावून

भावनांचे गीत झाले

स्पर्श पहिल्या थेंबाचा

आहे माझ्या स्मरणात

दवबिंदू जाणिवांचा

आहे स्मृती कोंदणात

बरसता भाव सरी

चिंब झाले तनमन

गंधाळता मनधरा

गवसले शब्द धन

आंतरिक आनंदाची

मग रचली कविता

विसरून भान सारे

जणू वाहते सरिता

दुःख ओसरून तेंव्हा

दान मोत्याचं लाभलं

नवं चैतन्यात सखे

मन माझं निवळलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract