तुझ्या सारखा नहीं.....
तुझ्या सारखा नहीं.....
फुले तर खूप बघितली
पण गुलाबा सारखी नाही
ज्याचा अलगच येई सुगंध
जो मनाला करतो बेधुंद
सुंदर असून पण मैत्री
करतो काट्याशी
म्हणून तर तुझ्या सारखा दुसरा कोणीच नाही.||ध्रु||
पक्षी तर खूप बघितले
पण मोरा सारखा नाहीं
ज्याचा मोरपिसारा फुलताच
मन माझे मोहून जाई
आभाळ आले की मनमोकळे होवून नाची
म्हणून तर तुझ्या सारखा दुसरा कोणीच नाही..||१||
प्राणी तर खूप बघितले,
पण कुत्र्या सारखा नाही..
ज्याच्या सारखा इमानदार ,माणूस सुद्धा नाही
शिळ्या पोळी वर ,घर आपलं राखतो
स्वतःची झोप मोडून , मालकाची झोप राखतो
म्हणून तर तुझ्या सारखा दुसरा कोणी नाही..||२||
माणसे तर खूप बघितले,
पण शिवाजी राजे सारखे नाही..
ज्यांनी मातेच्या बोलण्या वरून
परस्त्रिला माते समाण मानले,
जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतो
तेव्हा माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो
म्हणून तर तुमच्या सारखा दुसरा कोणीच नाही..||३||
