STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Classics Fantasy

3  

Mita Nanwatkar

Abstract Classics Fantasy

तोकडा विचार

तोकडा विचार

1 min
127

तोकडा विचार करता

होई संकूचीत ही दृष्टी

नंदनवन जरी भोवती

भासे उदासीन ही सृष्टी

दुष्ट अशा मन:लहरींनी

परमानंद राही‌ अधूरा

हातून नकळत निसटतो

जगण्याचा सार सारा

मी माझं करता करता

व्यापकतेचा पडे विसर

स्वत:तच गुंतून पडता

लाभते न सुखाची सर

मानवतेस आड आलेली

मान अपमानाची कमान

काळजातील भावनांनाच

मिळत नाही न्याय समान

तोकड्या या विचारांनीच

मनामनात राहते अंतर

सहज सूंदर आयुष्याचंच

मग सापडत नाही घर

स्पष्ट निखळ नजरेनी

बघावे जरा डोकावून

अवघे हे विश्वही प्रेमाने

हृदयात जाईल सामावून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract