प्रेमाची वाट......
प्रेमाची वाट......
प्रेम म्हणजे .....
प्रे म्हणजे प्रेरणा तुझी
म म्हणजे मन माझे
पहिलं प्रेम कधी विसरत नाही
ह्रदयात ते नेहमीं घर करतच राही
प्रेम असाव तर राधाकृष्णपरी राहो.......
काळजात जे थेट घर करत
तेच खर प्रेम ठरत..
प्रेमाची भाषा आज मला कळत आहे
नकळत आज मी तुझ्या कडे वळत आहे
दूर तू असूनही मन माझे तुला भेटायला
तळमळ ते आहे मन तुझ्याशी जुळते आहे...
प्रेमाला नको , नको म्हणता म्हणता
आज हो, हो कडे शब्द वळती आहे..
मलाच माझे काही कळत नाही आहे..
नेमके मला झाले तरी काय आहे?
याला प्रेम म्हणावे की तुझ्या कडील
ओढ म्हणावे....
तुच सांग आता मी काय करावे?
एकदाचे मला तुला भेटायचे आहे
तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता
होकारार्थी म्हणून तुला द्यायचे आहे..
मन माझे आनंदात हसते आहे..
आता मला पण तुझी तळमळ कळते आहे...
तू जसा माझ्या उत्तरा साठी आतुर होतास
आज मी पण तुला हो उत्तर देण्यासाठी
आतुरतेने तुझी वाट बघते आहे....

