प्रेमाची जादू
प्रेमाची जादू
कसली जादू होती तुझ्यात....
काही कळले नाही....
जेव्हा केव्हा तुला बघतो....
हरवून जातो मी तुझ्यात....
जेव्हा जेव्हा माझी नजर
तुझ्या नजरेत एकत्र झाली
तेव्हा तेव्हा मी या जगाला हरवून
एकरूप तुझ्यात होवून गेलो...
संपेल कधी हा आपला दुरावा ..
होवू केव्हा आपण एकरूप....
मला ही तुझ्या कुशीत मान ठेवून.....
ते सुंदर निळे आकाश बघायचे आहे....
ते बघताना हळूच तुझ्या त्या हाताचा....
स्पर्श माझ्या केसात अनुभवाचा आहे....
काय जादू तुझ्या डोळ्यात असावी....
रागाने बघितलं तरी तेवढच प्रेम .....
आणि हसून बघितल तर आणखी प्रेम...
जडते तुझ्या वरी.....
प्रेम माझ हृदय तुझ्यावर करतय....
पण डोळेच का बर लाजतय.....
मन ही तुझ्यात भिरभीरू लागतय...
जशी जादूच झाली तुझी....
माझ्या शरीरावरी हृदया परी....

