STORYMIRROR

Rajesh Gorivale

Others

3  

Rajesh Gorivale

Others

कोकण पुण्यभूमी

कोकण पुण्यभूमी

1 min
170

जय महाराष्ट्र, जय रत्नागिरी...

जय महाराष्ट्र, जय रत्नागिरी...


उतनार नाही अन् मातनार नाही,

निसर्गाचा ठेवा सदैव जपणार आम्ही,

आमचं नातं आहे शिवशंभूच्या गड-किल्ल्यांशी,

"कोकण"आमचा श्वास,"कोकण"आमचा ध्यास||


शिवरायांच्या आशीर्वादाने होतोय देशाचा विकास,

देशभक्तांच्या पावन कार्याने वाढलाय कोकणचा सन्मान,

आमचं आहे कोकणभूमीशी प्रेमाचं असं हे नातं,

"कोकण"आमचा श्वास,"कोकण"आमचा ध्यास||


कोकणभूमीत वाहे निर्मल समतेचा हा वसा,

शेती मळ्यात राबे हा माझा शेतकरी राजा कसा,

समाजसेवकांच्या वंशाचे आहोत हे संकेत आम्हां,

"कोकण"आमचा श्वास,"कोकण"आमचा ध्यास||


सह्याद्रीचे रक्षक शिवभक्त मावळे आहोत आम्ही,

कोकणचा नावलौकिक जगभर वाढवणार आम्ही,

एकसंघ समाजाची आम्हां असे नेहमीच जाण,

कधी झुकणार नाही,वाढऊ फक्त कोकणची शान,

"कोकण"आमचा श्वास,"कोकण"आमचा ध्यास||



Rate this content
Log in