STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

शिवाजी – तत्वनिष्ठ राजन

शिवाजी – तत्वनिष्ठ राजन

1 min
0

      शिवाजी – तत्वनिष्ठ राजन

कैद्यांशी व महिलांशी वागणूक होती न्याय्य,

मुलगी, बहीण, माता, सून – सर्वांना दिला सन्मान सप्रेम.

कैदी भूमिपुत्रांना स्वराज्याचे दाखविले स्वप्न खरे,

न समजले तरी आदराने केली मुक्त सुटका सवे.


धार्मिक मृतपरंपरा, अंधश्रद्धेला नव्हते स्थान,

बहुजनांच्या मुक्तीसाठी चालविला अभियान महान.

वर्णव्यवस्था हळूहळू होत होती अध:पतन,

धार्मिक संरक्षणप्राप्त वर्ग झाला होता खिन्न.


जिजाऊच्या संकल्पनेतून झाला राज्याभिषेक,

शिवाजींना मिळाले धार्मिक मान्यतेचे महादान नेक.

सर्वत्र मिळाली राजसत्ता व समप्रभुता मान,

कटकारस्थान करणाऱ्यांना दिला दंडाचा फर्मान.


धार्मिक मक्तेदारांनी रचले कटकारस्थान,

“शूद्र शिवाजी कसे होतील मराठाराज्याचे राजन?”

जिजाऊ-शिवाजींनी तोडले गुलामगिरीचे शासन,

गागाभटाला दिले राज्याभिषेकाचे आमंत्रण.


शिवाजी झाले मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपति,

धार्मिक नेतृत्वाचा झाला ऐतिहासिक पराभव क्षणभरी.

समतामूलक समाजाची घडण केली त्यांनी,

अष्टप्रधान मंत्रीमंडळ स्थापन केले स्वराज्यात त्यांनी.


समानता, न्याय, बंधुत्व, समान अवसर, प्रजा संरक्षण,

 मराठा साम्राज्याच्या राज्यघटनेची होती प्रस्तावना.

 शिवाजी फक्त शूरवीर नव्हते, तर समाजसुधारक महान,

 स्वराज्यात सामाजिक ध्येयांची केली त्यांनी निर्धारण.


मतभेद, मनभेदांपासून कुटुंब होते मुक्त,

जिजाऊ-शिवा कुटुंबाचे होते नितीतत्त्व दृढ.

छत्रपति शिवाजींना होत्या आठ पत्नी,

दोन पुत्र, सहा कन्या – कुटुंबातील मौल्यवान अपत्य


छत्रपति शिवाजी महाराज होते बहुगुणी संपूर्ण राजन,

समस्या निरसन ,संवाद,उत्कृष्ट राजनीति,स्वाभिमान,

चारित्र्य,सर्वज्ञानी,दूरदृष्टि नियोजन व कृती,नीतिवान,

महिला-सम्मान,मानवता,गुनवत्ता,संसाधन,जनकल्याण,

आधुनिकता सार्वजनिक निर्बंध सर्वोत्तम आणि करुणा,

रामराज्यतुल्य शिवराज्य मावळ्यासाठी लयभारी वरदान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract