छत्रपति-शिवाजी.
छत्रपति-शिवाजी.
छत्रपति-शिवाजी.
जिजाऊ–शाहाजींच्या स्वप्नांची ठेवली जाणीव,
स्वराज्य भारतभूमीवर करावयाचे होते स्थापन.
जिजाऊ–शाहाजी होते खरे योजनेचे शिल्पकार,
छत्रपति शिवाजींनी दिली त्या स्वप्नांना घडण.
मातीतील भूमिपुत्रांचे केले प्रथम एकत्रीकरण,
नौदल, घोडदळ, विशाल लष्कराची केली उभारणी.
भारतीय नौदलाचे संस्थापक म्हणून मिळाला मान,
गडागडांवर भगवा फडकवून मिळवला विजयदान.
शक्ती, युक्ती, युद्धनीती यांचा केला सुयोग्य वापर,
तडजोडीपेक्षा रणनितीने साधला विजय अपार.
स्वराज्य सेनेबाबत राजे सदैव सावधान,
घोडे, हत्ती, लष्कराचे युद्धात किमान नुकसान.
मोगल, आदिल, कुतुब, निजामशाहीवर केली चढाई,
कधी मैत्री, कधी शत्रुता, कधी संधी साधली.
तीनशेपेक्षा अधिक गडांवर स्वराज्याचे नियंत्रण,
मराठा साम्राज्याचा केला युक्तीने विस्तारिकरण.
शेतकरी,पिडीत,मुले व महिलाकडे विशेष ध्यान,
मातीतील सर्वच धर्मांचा होता आदर एकसमान.
शासन व्य्वस्थेत आणले आमुलाग्र परिवर्तन,
शेती मालासाठी दक्ष,युद्धात नाही होणार नुकसान.
शेतकऱ्यांचे युद्धामुळे झाले जर मोठे नुकसान,
सरकारी कोषातून होती भरपाईची तरतूद.
महिला, मुले, वृद्धांना युद्धात मिळे संरक्षण,
शिवराजदरबारात नर्तकी नृत्याचे नसायचे सादरीकरण.
शेतकरी, पीडित, महिला व मुलांकडे विशेष ध्यान,
मातीतील सर्व धर्मांचा होता आदर समान.
शासनव्यवस्थेत आणले आमूलाग्र परिवर्तन,
शेतीमाल सुरक्षित, युद्धात टाळले नुकसान.
