चंद्र दिसला...
चंद्र दिसला...
चंद्र काल दिसला दूधात विरघळताना...
चांदण्या हळूच लपल्या मी तुला पाहताना...
तू पाहता उमटावी दुधात केशरी छटा...
नजरेच्या झोक्याने उधळून द्याव्या बटा...
सूर सतारीचे अंधुकसे ऐकू येती दुरून...
घोट अमृताचे सरती पुनवेच्या संधीतून...

