जुनीच मी
जुनीच मी
नवीन वर्षातली जुनीच मी
नव्या कागदांची जुनी वही
पून्हा श्रीकाराने नवी सुरुवात
जुनाट रुसव्यावर नवी मात
उगाच दोषारोपपत्र आता
जुने वर्ष मागे जाऊ पाहता
प्रारब्धाची थोडी कानउघडणी
नयनी थयथय मंजूळ गाणी
तिथेच स्थिरावलेली उभी मी
विरझणात जमावे जसे दही
नवीन वर्षातली जुनीच मी
नव्या कागदांची जुनी वही

