बघ जमतय का ?
बघ जमतय का ?
सकाळ होईल मनासारखी,
अंथरुणात लोळत पडलेली ती...
कित्ती वाजले ?अरे बापरे !
असं काहीही न म्हणणारी ती...
असं म्हणायला,
बघ जमतंय का तुला ??
वेळेचं कसलच नाही भान,
घडाळ्याच्या काट्यांचा नाही मान...
पांघरुणाची विस्कटलेली घडी,
चुरगळलेल्या अभ्र्यात उशी बापडी...
असं जगायला,
बघ जमतय का तुला ??
मग उठायचा होतो मोह,
डोक्यात,मनात नुसताच ऊहापोह...
अचानक हाती यावा फक्कड चहा,
दिवसभराचा निर्भेळ उत्सव पहा...
असं पहायला,
बघ जमतंय का तुला ??
थोडा स्वतःच घ्यावं आवरून,
तयार व्हावा थोडं नटून...
कॉम्पॅक्टचा मंद मंद सुवास,
हलक्या रंगाच्या लिपस्टिकचा शेड खास...
अस रंगायला,
बघ जमतय का तुला ??
गडद रंगाची लिननची साडी,
प्रिंटेड ब्लाऊजवर न सुटणारी कोडी...
गळ्यात नाजूकसा ऑक्साईडचा सर,
लहानशा झुमक्यांनी केला कहर...
असा सजायला,
मग जमतय का तुला ??
मॅचिंग कडा चढवत हाती,
नाजूकशी टिकली कपाळावरती...
केस थोडे द्यावे मोकळे सोडून,
घ्यावं स्वतःला आरशात न्याहाळून...
अस न्याहाळायला...
बघ जमतय का तुला ?
कराव जमेल तसं स्वतःतच कौतुक,
आपणही दिसतो की अगदी नाजूक....
आरशालाही गर्व व्हावा त्याचा त्याचा,
सुंदर रुपड्याला आपल्यात पहावं याचा...
असं पाहायला ;असं राहायला,
बघ जमतंय का तुला ??
सिल्वर शेडची पर्स टाकुन खांद्यावर,
अन् मंदिरात नको हं,आज फेरफटका मॉलवर...
मुलं नवरा यांची नाही इनिंग,
फक्त तुझी नी तुझीच शॉपिंग...
तुला जे आवडेल तेच घ्यायचं...
मेंदूला सरकवून थोडं,
मनाला त्या जागेवर ठेवायचं...
अस ठेवायला;अस घ्यायला,
बघ जमतय का तुला ??
रंग पोत सारं तूच ठरवायचं,
ट्रायलरूम मध्ये ट्राय पण करायचं...
बरं वाटलं तर घ्यायचं काही,
मनापेक्षा पाकीटाला आज किंमतच नाही...
अस सुख मोजायला,
बघ जमतय का तुला ??
झालं सारं घेऊन आपल्यासारखं,
की गाठायचा फूड मॉल सरळ...
पिझ्झा बर्गर पास्ता आणि फ्रॅंकी,
नुसत्याच वासाने जिभेला गरळ...
अस खायला,
बघ जमतय का तुला ??
थंडगार कुल्फीची चव घेत,
वरखाली भटकत रहायच...
चुकले-चुकले म्हणत सारं ,
तू मात्र फिरून घ्यायचं...
अस भटकायला,
बघ जमतय का तुला ??
मनातल्या मनात साखर चघळत,
तू तेव्हा घर गाठायचं...
आणि थकलेला भागलेला गरीब जीव,
पुन्हा अंथरुणात लोळत पडायचं...
अस थकायला,
बघ जमतय का तुला ??
