Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepali Mathane

Romance

4  

Deepali Mathane

Romance

प्रीतीचं झुळझुळ पाणी

प्रीतीचं झुळझुळ पाणी

1 min
503


*नयनांची अबोल ही प्रीती,जशी लुकलुकते चांदणी*

*शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पाणी।। धृ।।*


छेडित मनीची तार, सूर झंकारले जीवनी

नाद गंधाळल्या वेळी, प्रीत जागली मनी

सप्तसूर सजवूनी साज,गीत आकारले जीवनी

*शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पाणी*

*नयनांची अबोल ही प्रीती, जशी लुकलुकते चांदणी।।१।।*


कळीची उमलूनी भावना, प्रीत मोगरा बहरला मनी

लाजऱ्या गर्द कळीचे, प्रीतफुलं उमलले रानी

दरवळला आसमंत सारा,धुंद सुवास छेडूनी काननी

*शिंपीत चांदणे हे,प्रीतीचं झुळझुळ पाणी*

*नयनांची अबोल ही प्रीती, जशी लुकलुकते चांदणी।।२।।*


नजरेचे तव मधुर बाण, मज घायाळ करूनी

स्वप्नाळल्या जीवांची,भावना कोमल बहरूनी

आलिंगणात भिजली, एक चंचल हरिणी

*शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पाणी*

*नयनांची अबोल ही प्रीती, जशी लुकलुकते चांदणी ।।३।।*


लाज गालीची खट्याळ,सजली पापणीत दाटूनी

गोड सख्याचा विळखा,घेई मजला वेढूनी

दो जीव प्रणयातील, तरले प्रीत सागरातुनी

*शिंपीत चांदणे हे, प्रीतीचं झुळझुळ पाणी*

*नयनांची अबोल ही प्रीती,जशी लुकलुकते चांदणी।। ४।।*


Rate this content
Log in