STORYMIRROR

Sonali Kose

Romance

4  

Sonali Kose

Romance

मनात राहून गेले

मनात राहून गेले

1 min
453

ठरवले एकदाचे कसे बसे

भेटावे तुला कधी एकांतात

इशारा करशी मज काही असा

एका नजरेने वसला तू काळजात


माझ्या भोळ्या मनालाही 

वाटे होशील कधी तू माझा

दाटले मनी भावनांचे धुके

नकळत भान हरवेल तुझा


कधी कधी स्वप्नात माझ्या

ओढ तुझीच लागली असते 

उणीव भासते तुझी मला

मात्र जवळ तू माझ्या नसते


स्पंदने दोघांच्या हृदयाची

नव भाव सांगून जातो

नाजूक धागा दोन जीवांना

एका प्रेम धाग्यात जोडतो


प्रेमाची परिभाषा कळाली

तुझ्यावर जीव जडल्यावर

क्षणोक्षणी कासावीस करणारी

चाहूल तुझी मला लागल्यावर


सांगावेसे वाटते खूप काही

वेड तुझेच मला लागले

प्रेमाच्या धुंदीने नकळत

शब्दच मनात राहून गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance