STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

4  

Deepali Mathane

Romance

जीवनाच्या सायंकाळी

जीवनाच्या सायंकाळी

1 min
469

जीवनाच्या सायंकाळी

सख्या तुझा हातात हात

 तू मला अन मी तुला

हिच जन्मोजन्मी साथ


   थरथरत्या हाताला माझ्या

   भक्कम तुझा आधार वड

   थकलेल्या दोन जीवांना ना

   एकमेकांशिवाय आधार धड


जीवनाच्या वाटेवरती

उधळूनी तू रंग सारे

इंद्रधनूसवे सजविले

माझ्या आयुष्यात नजारे


    जळताना या वातीसम

    जशी दिव्यास लागे आस

    तरीही न सोडली तू सख्या

    मजसाठी सुखाची कास


घायाळ झाली पाऊले

दुःखाची न जाणीव झाली

तुझ्या सवे चालतांना

काट्यातही फुले उमलली


   घायाळ पाय सख्या

   जरी कधीमधी डगमगले

   तुझ्या आधारानेच मी

   सगळे बळ एकवटले


 तूच सुख तूच सौभाग्य

 तूच माझ्या अंतरिचा गाभा

 तुजसवे लाभली मज

 सुवर्णमयी नक्षत्रांची आभा...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance