STORYMIRROR

Seema Kulkarni

Romance

4  

Seema Kulkarni

Romance

गुंतले असे तुझ्यात

गुंतले असे तुझ्यात

1 min
596

गुंतले अशी तुझ्यात,

माझी मी ना राहीले,

स्वरभाव अंतरीचे,

सर्वस्व तुजला अर्पिले. १.


श्वासामधुनी लयींच्या,

आळवित तुजला जागले,

स्पंदने आर्त स्वरांची,

वेदनेत हसवत ,हसले. २.


शोधूनी अर्थ सगळे,

हुंकारातुनी जाणीवेच्या,

प्रतिसाद भावनांचे,

फुलवीत आशा सुखाच्या. ३.


अर्पणभाव सुखाचा,

ओंजळीत मी झेलला,

कृतार्थ तव दर्शने,

मार्ग मजला गवसला. ४.


अडथळ्यांचा हमरस्ता,

मार्ग काटेरी वळणावरचा,

साथ जुळता पावलांची,

निर्धास्त किनारा जगण्याचा. ५.


तृप्त जाहले जन्माची,

जगी खेळ भावनांचा,

माप ओलांडुनी उंबऱ्याचे,

आधार तूच जीवनाचा. ६.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance