पण सखे..!
पण सखे..!
घेऊन खळी गालावर तू आलीस…!
लावून लाली ओठांवर तू आलीस…!
डाळिंबी दातांनी ओठ चावत तू आलीस…!
असं उगीच कुणी नटून थटून नखरा करतं का..?
चोरून वळून लाजून कोणी असं बघतं का..?
तू काहीही म्हण सखे…!
पण मला माहित आहे…!
तू उगीच नाही आलीस…!
तू फक्त मला बघायलाच आलीस…!
चंद्रहार घालून गळ्यामंधी तू आलीस…!
नाकावर नथनी उडवीत तू आलीस…!
सोळा शृंगारही करून तू आलीस…!
असं उगीच कुणी शृंगार साज करतं का..?
नसतानां सणवार असं दागिने कोणी घालतं का..?
तू काहीही म्हण सखे…!
पण मला माहित आहे…!
तू उगीच नाही आलीस…!
तू फक्त मला बघायलाच आलीस…!
केसाचा अंबाडा बांधून तू आलीस…!
गोल गजरा त्यावर माळून तू आलीस…!
बटांचा आकडाही काढून तू आलीस…!
असं उगीच कुणी सजून धजून येतंय का..?
अन् पाहून न पाहिल्यासारखं कोणी करतं का..?
तू काहीही म्हण सखे…!
पण मला माहित आहे…!
तू उगीच नाही आलीस…!
तू फक्त मला बघायलाच आलीस…!
नऊवारीचा साज चढवून तू आलीस…!
मोरपंखी पैठणी लेवून तू आलीस..!
पण त्याचा पदर वाऱ्यावर सोडून तू आलीस…!
असं उगीच नटरंगी बहाणा कोणी करतं का..?
मन येडं खुळ करून असं कोणी सोडतं का..?
तू काहीही म्हण सखे…!
पण मला माहित आहे…!
तू उगीच नाही आलीस…!
तू फक्त मला बघायलाच आलीस…!
अत्तर केवड्याचं लावून तू आलीस…!
कस्तुरी प्रेमाची घेऊन तू आलीस…!
पण मनातलं गुपित लपवून तू आलीस…!
असं उगीच कोणी दुःख लपवून ठेवतं का..?
हृदयातली सल कुठं अशी लपून राहते का..?
तू काहीही म्हण सखे…!
पण मला माहित आहे…!
तू उगीच नाही आलीस…!
तू मनातलं सारं खोलण्यासाठीच आलीस…!

