Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Tathod

Romance

4  

Sangita Tathod

Romance

तू आणि संध्याकाळ

तू आणि संध्याकाळ

1 min
596

तुझी अन माझी

नुकतीच बांधली होती लग्नगाठ - - -

तू दिवसभर बिझी अन मी पण

सकाळच्या, त्या गडबडीत

व्हायची आपली, इवली भेट

पण संध्याकाळ असायची आपली हक्काची

तुझं ते बाईक घेऊन, माझ्या ऑफिस बाहेर उभे राहणे

आतुरतेने माझी वाट पाहणं - - -

होते रोजचेच - -

तरीही रोज वाटायचे नवे नवे

मला उशीर लागला तरीही 

न चिडता, गोडसे स्माईल देणे

संध्याकाळचे मावळतीचे रंग 

तुझ्यासोबतीने छान खुलायचे

कधी कॉफी शॉप

तर कधी चहाची टपरी

तर कधी गावाबाहेरील देवीचे मंदिर - -

स्थळ कुठले असले तरीही 

नसायची मला काळजी

तू अन तुझ्यासोबतची संध्याकाळ

असायचे ते मंतरलेले क्षण

त्यातच लपले होते प्रेमाचे किती कण - - -  

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance