पहाट
पहाट
रात काळोखी सरली
आली चैतन्य पहाट
हळुवार अवखळ
दिसे हसरी ही लाट
सुगंधित दरवळ
चहूकडे फुलांसंगे
हसतात वृक्षवेली
चित्र सुरेख आगळे
मन मनातील गुज
सांगे मनास अपुले
स्वर मंजुळ पक्षांचे
नाद अंतरी जपले
उजाडले रान सारे
मन झाले प्रफुल्लित
देहासंगे,चित्तवृत्ती
झाल्या पहा उत्तेजित
