STORYMIRROR

Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

रंग होळीचे नि प्रितीचे

रंग होळीचे नि प्रितीचे

1 min
160

दाह उन्हाचा वाढला 

 रानी पळस फुलला

रंग होळीचे खेळता 

झुला प्रितीचा झुलला


रंग रंगात मिळाला

विसरला तो स्वरूप

नकळत झाला तुझ्या 

मनाशी तो ,एकरूप


चैतन्याचा तू बहर

तुझी लागली गोडी

रंग , रूप दूर सारू

उधळूया प्रीत थोडी


थोडे थोडे करुनिया

रंग सारेच उधळू

सृष्टीच्या रंगात आपण

प्रितीचा रंग मिसळू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance