STORYMIRROR

Sangita Tathod

Others

3  

Sangita Tathod

Others

मराठीचा बाणा

मराठीचा बाणा

1 min
123

माझ्या मराठीची गोडी

जणू ती मधाची पोळी

  अविरत त्यात वसे

मधाळ शब्द कोवळी


माय मराठीचा राग

जणू फणसाचे फळ

वरून असती काटे

पोटी गरे ती रसाळ


हिच्या शब्दांची माया

जशी गोधडीची ऊब

धाग्या धाग्यांनी विणला

एक एक शब्द खूब


माय मराठीचा बाणा

जणू मावळा शूर

कडेकपारी घुमतो

तिचा नाद सर्वदूर


माझ्या मराठीचे रूप

कसे सजले सजले

शब्दलांकरांनी बघा

कसे खुलले खुलले



Rate this content
Log in