STORYMIRROR

Sangita Tathod

Classics

3  

Sangita Tathod

Classics

दीपावली

दीपावली

1 min
342

दीपमाळा गेल्या रोषणाई आली

पाच दिसाची दिवाळी ,दोनची झाली


नव्या कपड्यांची नवलाई गेली

रोजची नवी नवी फॅशन आली


रंगीबेरंगी प्लास्टिक पेंटन्स आले

शेणा मातीने हात भरवणे संपले


करंज्या ,अनारसे नैवेद्या पुरते

भेळपुरी नी पिझ्झा मनात भरते


असे सारे बदल दिवाळीत झाले

आनंदाचे क्षण तसेच राहिले


अजूनही ओढ आहे ,लेकाला घराची

वाट पाहते सासू घरच्या लक्ष्मीची


बदल सर्व स्वीकारत रहायचे

झालं गेले ते सारे सोडून द्यायचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics