एक वाट झाली
एक वाट झाली
सहज चालता चालता
झाली अपुली एक वाट
हसत हसत पार झाला
समोरचा अवघड घाट
माझी तुला,तुझी मला
लागली अशीच सवय
अगणित संकटांचे
गेले मनातील भय
नकळत जुळले नाते
कधी ते लादले नाही
समजून,उमजून
जुळवून घ्यावे सर्व काही

