STORYMIRROR

Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

तुझ्या आठवांचा

तुझ्या आठवांचा

1 min
151

तुझ्या आठवांचा असा

ओलता श्रावण मास

रिमझिम सरींपाठी

फक्त तुझेच आभास

सप्तरंगी इंद्रधनूचे

नभी रंग विखुरले

याद तुझी देवूनी

मन प्रीत रंगी न्हाले

ऊन सावलीचा चाले

खेळ पाठशिवणीचा

मला थांग लागे ना

सख्या तुझ्या मनाचा

हिरव्या वनराईत

श्रावण झुले झुलले

तुझ्या आठवांचे पहा

मेघ आता गोळा झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance